गडचिरोली येथे कामचुकार कर्मचार्‍यांमुळे कार्यालय केले सील !

‘कामात दिरंगाई करणे, कार्यालयात विलंबाने येणे, निष्काळजीपणा त्यांच्यात होता. १ मास वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

भिवंडी येथे मणी बनवणार्‍या कारखान्याला आग !

भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या प्लास्टिकचे मणी बनवणार्‍या कारखान्यास २९ ऑगस्टला भीषण आग लागली. या आगीत कारखाना जळून खाक झाला असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

चितावणीखोर वक्तव्य करणार्‍या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करा ! – ‘मी इचलकरंजीकर’ संघटनेच्या वतीने निवदेन

सुळकूड पाणी योजनेवरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘ही योजना झाल्यास रक्तपात होईल’, तर माजी आमदार के.पी. पाटील यांनीही कर्नाटकमधील नागरिकांना भडकवणारे विधान केले आहे.

पिंपरी-चिंचवड येथे दुकानाला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा मृत्यू !

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ‘शॉर्टसर्किट’मुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर कुटुंब मूळचे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील आहे.

जिओ आस्थापनाकडून वाई (जिल्हा सातारा) शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी !

केबल टाकणे आणि गळती काढणे या कामांसाठी जिओ आस्थापनाने वाई शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. या कृतीचा समाजातून निषेध व्यक्त केला जात आहे.

सुळकूडमधील दूधगंगा नदीमधून इचलकरंजीला पाणी देण्यात येऊ नये ! –  दूधगंगा बचाव कृती समिती

इचलकरंजी शहरास सध्या उपलब्ध पाणीसाठा, पाण्याचे स्रोत, पाण्याची आवश्यकता याचे सर्वेक्षण करावे. इचलकरंजी शहरास पाणी अल्प पडत असेल, तर ते कृष्णा किंवा वारणा नदीतून उपलब्ध होऊ शकते.

भाईंदर येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील लाचखोर मुख्य लिपिक कह्यात ! 

गृहनिर्माण संस्थेला नोटीस बजावणे, व्यवस्थापक नेमणे आणि लेखापरीक्षण करणे यांसाठी भाईंदर येथील उपिनबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक शेख अली हैदर दगडू मिया (वय ३५ वर्षे) याने ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

गणेशोत्सवात आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेची चेतावणी !

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी आतंकवाद नष्ट करण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्याने हिंदूंचे सण आणि उत्सव आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करण्याची लाजिरवाणी स्थिती ओढवली आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घाला ! – सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघ

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणास हानी पोचत आहे. त्यामुळे अशा मूर्ती बनवणे, त्यांची आयात करणे आणि साठवणूक करणे यांवर बंदी घालावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दोषींवर कारवाई करू ! – अतुल सावे, गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्‍याणमंत्री

या संदर्भात राज्‍यशासनाकडून पूर्ण काळजी घेतली जात असून त्‍यांना साहाय्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केली जाणार नाही. या संदर्भात उत्तरदायी असणार्‍या दोषींवर कारवाई करू, असे आश्‍वासन गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्‍याणमंत्री अतुल सावे यांनी दिले.