परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
अनेक दाखले हिंदूंसमोर असूनही भारतात प्रतिदिन स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. कुठे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे सध्याचे जन्महिंदू !
‘सध्या समाजात प्रत्येक जण मानसन्मान आणि प्रतिष्ठा यांसाठी विविध पदव्या अन् पैसे मिळवतात. याउलट सनातन संस्थेमध्ये प्रत्येक जण कोणत्याही व्यावहारिक फळाची अपेक्षा न करता तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
काही वेळा काही संतांचे वागणे बघून काहींना वाटते, ‘यांना मनोविकार झाला आहे का ?’ अशा वेळी हे लक्षात घेतले पाहिजे की, संतांचा मनोलय झालेला असल्यामुळे त्यांना कधीच मनोविकार होत नाही.
‘हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे की, ज्यामध्ये प्रत्येक जिवाचा उद्धार होण्याविषयी विचार केला आहे. त्यामुळे एखाद्याला हिंदु धर्मात जन्म मिळाल्यास, तो त्याचे क्रियमाण वापरून याच जन्मात ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
‘नावही इंग्रजी भाषेत असणार्या ‘काँग्रेस’ पक्षाला देशाभिमान किती असणार ? देश स्वतंत्र होऊन आज ७४ वर्षे झाल्यावर या पक्षाने केलेल्या कार्यावरून ते सिद्धच होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सनातनचे संत केवळ ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना जिज्ञासू आणि साधक यांना ‘तन, मन आणि धन यांचा त्याग कसा करावा ? प्रारब्ध सहन करण्यासाठी साधना कशी वाढवावी ?’, हे शिकवतात. त्यामुळे . . .
‘सध्या हिंदूंवर आक्रमणे झाल्यावर बहुधा त्यांनाच स्वतःचे रक्षण करावे लागते. असे आहे, तर सरकारी यंत्रणा का पोसाव्यात, असा प्रश्न कोणाला पडला, तर त्यात चुकीचे काय ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘डॉक्टर, अधिवक्ते, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले