नवाब मलिक हे आमचे जुने सहकारी ! – सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मधील कालावधीमध्ये झालेल्या घडामोडींशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते विधानसभेचे सदस्य आहेत.

नवाब मलिक सत्तेत सहभागी होण्याची शक्यता !

मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी हातमिळवणी करून मुंबईतील गोवावाला कंपाऊंड येथील ३ एकर भूमी हडप केल्याच्या आरोपावरून अटक झालेले आणि सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक विधानसभेत अजित पवार गटातील सदस्यांसमवेत बसले होते.

देशद्रोहाचा आरोप असलेल्या नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी नवाब मलिक यांना मंत्रीपदावर कायम ठेवणार्‍या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सत्तेत सहभागी होण्याची शक्यता !

नवाब मलिक सभागृहात अजित पवार यांच्या बाजूच्या गटात बसले होते, तसेच सभागृहाचे कामकाज संपल्यानंतरही अजित पवार कार्यालयात उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्याच्या निर्णयावरून ७ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.

शरद पवार गटाकडून उपरोधिक फलकबाजी करून १० दिवसांच्या अधिवेशनाची खिल्ली !

अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून ‘१० दिवसांच्या या अधिवेशनाला येणार्‍या सर्व मान्यवरांचे स्वागत’ असा उपरोधिक आशय असलेले अनेक फलक शहरात लावण्यात आले आहेत.

शिवराजसिंह चौहान मामाजींचे नेतृत्व मध्यप्रदेशातील निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरले ! – सुप्रिया सुळे, खासदार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया !

जालना येथे टोळक्याकडून राजेश टोपे यांच्या वाहनाची तोडफोड !

जालना येथे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या चारचाकी वाहनावर २ डिसेंबर या दिवशी अज्ञातांनी आक्रमण केले.

बेछूट आरोप करण्यापूर्वी या प्रश्नांची उत्तरे द्या !

सुरज परमार आत्महत्या प्रकरणी कुणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात, अनंत करमुसे यांच्यावर पोलीस संरक्षणात आक्रमण करण्याचा बालिशपणा का केलात ? आणि वैभव कदम यांच्या आत्महत्येस उत्तरदायी कोण ?

शरद पवार समर्थकांनी प्रसिद्ध वक्‍ते नामदेव जाधव यांच्‍या तोंडाला काळे फासले !

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार गटाच्‍या कार्यकर्त्‍यांनी प्रसिद्ध वक्‍ते नामदेव जाधव यांच्‍या तोंडाला येथे काळे फासलेे. माध्‍यमांशी बोलत असतांनाच पवार समर्थकांनी अचानक नामदेव जाधव..