सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणाऱ्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

गुरुपौर्णिमा महोत्सव २०२१ मध्ये कोची, केरळ येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘गुरुपौर्णिमा २०२१ च्या आधी आम्ही चित्रीकरण करत होतो. त्या वेळी पाऊस चालू झाला. त्यामुळे श्रीमती सौदामिनी कैमल (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८० वर्षे) यांनी वरुणदेवतेला प्रार्थना केली. त्यानंतर पाऊस थांबला.

गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक

कासवी जशी केवळ दृष्टीमात्र पिल्लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करतात. 

गुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक

ज्याप्रमाणे मुलाला बोलायला शिकवतांना प्रारंभाला लहान शब्द शिकवतात, चालायला शिकवतांना हळूहळू चालवतात,तसेच गुरुही शिष्याला टप्प्याटप्प्याने हळूहळू शिकवतात.

गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्लक

अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे.    

गुरुपौर्णिमेला २0 दिवस शिल्लक

‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे.

gurupournima

गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक

गुरु हे २४ घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.

गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

ईश्वराचे मारक रूप काही शिकवण्यासाठी रागावले, तर त्याच वेळी ईश्वराचे तारक रूप म्हणजेच गुरु भक्ताला सांभाळून घेतात; परंतु गुरु म्हणजे तारक रूपच रागावले, तर त्यांची क्षमा मागण्यावाचून दुसरा मार्ग नसतो.

गुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक

कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.

गुरुपौर्णिमेला २६ दिवस शिल्लक

बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात. ते विचार शिष्याच्या उन्नतीसाठी पोषक असल्यास गुरु त्यानुसार वागतात.