‘सनातन संस्थे’च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या प्रसारासाठी फलक तसेच निमंत्रण पत्रिका उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवांच्या प्रसारासाठी आवश्यक असलेले प्रसाराच्या साहित्याची कलाकृती (आर्टवर्क) नेहमीच्या संगणकीय ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे.

गुरुपौर्णिमेला ३५ दिवस शिल्लक

जो शिष्याला वैराग्य देऊ शकतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण करू शकतो, तोच खरा सद्गुरु !

गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते.

गुरुपौर्णिमेला ३७ दिवस शिल्लक

जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात.

गुरुपौर्णिमेला ३८ दिवस शिल्लक

शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय.

गुरुपौर्णिमेला ३९ दिवस शिल्लक

स्वतःच्या ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात.

गुरुपौर्णिमेला ४० दिवस शिल्लक

गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो. 

गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.    

gurupournima

गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारासाठी भित्तीपत्रक उपलब्ध !

स्थानिक गुरुपौर्णिमा महोत्सवाचे स्थळ आणि वेळ घालून, तसेच त्यासाठी प्रायोजक मिळवून प्रसारासाठी ते मंदिरे, रहिवासी संकुले, शाळा-महाविद्यालये, वाचनालये, हिंदुत्ववादी संघटनांची कार्यालये आदी सुयोग्य सार्वजनिक ठिकाणी लावावेत.