लेस्टर, इंग्लंड येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मिलिंद खरे यांना नवरात्रीनिमित्त झालेले विशेष भक्तीसत्संग ऐकतांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

७ ते १५.१०.२०२१ या नवरात्रीच्या ९ दिवसांच्या कालावधीत झालेले भक्तीसत्संग पुष्कळ चैतन्यदायी आणि शक्तीदायी होते.

देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

१.६.२००६ या दिवशी मी नोकरीतून निवृत्त झाले. तोपर्यंत मी नोकरी आणि कुटुंब सांभाळून जमेल तशी थोडीफार साधना करत होते.

मृत्यूशी झुंज देतांना अखेरच्या श्वासापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करणारी नांदगाव, ता. चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील कै. (कु.) संजीवनी सुशांत शेलार (वय २७ वर्षे) !

ती प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सतत स्मरण करत होती. ती त्यांच्याकडे त्रासाशी लढण्यासाठी बळ मागत होती. ‘तिच्याकडून अखेरच्या श्वासापर्यंत श्री गुरूंचे स्मरण होऊ शकले’, ही गुरुदेवांचीच कृपा आहे.

भक्तभेटीला स्वयं श्रीहरि हा आला ।

अवचित प्रत्यक्ष पाहूनी हरीला । भावभक्तीचा बंधारा फुटला ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या रथोत्सवाच्या वेळी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘रथोत्सव’ सोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांच्या संदर्भात युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले, ते पुढे देत आहोत.

संगीताच्या संदर्भातील लेखमालेत ‘भावनागीत’, असा शब्दप्रयोग करण्यामागील कारण

भारतीय संगीतामध्ये ‘शास्त्रीय संगीत’ आणि ‘सुगम संगीत’ असे प्रकार आहेत. सुगम संगीतात विविध भावना प्रकट करणार्‍या गीतांचा समावेश असतो.

अंतर्मुख, प्रगल्भ विचारांची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली पुणे येथील दैवी बालिका कु. प्रार्थना महेश पाठक !

‘‘प्रार्थना, तू लवकरच संत होशील ना ! तेव्हा मी तुला ‘पू. प्रार्थना’ असे म्हणीन.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी संत झाले, तरी मी स्वतःला ‘गुरुदेवांची शिष्या प्रार्थना’ असेच म्हणीन.’’

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना पाहिलेले नसूनही एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. प्रिया प्रभु यांना आलेली त्यांच्या संदर्भातील अनुभूती

मी पुष्कळ भाग्यवान आहे; कारण मला परात्पर गुरु डॉक्टरांचे स्वप्नात दर्शन झाले. त्यांचे दर्शन होणे अविश्वसनीय असले, तरीही ते सत्य आहे.

शिष्यभाव

भावामुळे स्थूलदेहाची शुद्धी होण्यास आरंभ होतो. देहाची शुद्धी होणे म्हणजे सत्त्वगुण वाढणे. या प्रवासात जीव साधनेतील अनेक टप्पे शिकत असतो. व्यक्त भावामुळे प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी होते, तर अव्यक्त भावामुळे प्राणमयकोष आणि मनोमय कोष यांची शुद्धी होते.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

सद्गुरु काकू प्रत्येक व्यक्तीमधील भगवंताला अनुभवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘‘एखादी कृती करतांना जर भाव नसेल, तर तीच कृती परत भाव ठेवून करायची.