परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या रथोत्सवाच्या वेळी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सप्तर्षींच्या आज्ञेनुसार वर्ष २०१५ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यापूर्वी झालेल्या त्यांच्या जन्मोत्सव सोहळ्यांत श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीसत्यनारायण या देवतांच्या रूपांत (वेशभूषेत) साधकांना दर्शन दिले. सप्तर्षींच्या आज्ञेने २२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त ‘रथोत्सव’ साजरा करण्यात आला. ‘रथोत्सव’ सोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांच्या संदर्भात ‘यू.ए.एस्. (युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. ते पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वस्त्रालंकार परिधान करण्यापूर्वी (रथोत्सवापूर्वी) आणि परिधान केल्यानंतर (रथोत्सवानंतर) वस्त्रालंकारांच्या ‘यू.ए.एस्. (युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रथोत्सवात वस्त्रालंकार परिधान केल्यानंतर वस्त्रालंकारांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वस्त्रालंकार परिधान करण्यापूर्वी (रथोत्सवापूर्वी) वस्त्रालंकारांमध्ये काही प्रमाणात नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा होती. रथोत्सवापूर्वी वस्त्रालंकारांतील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ७ ते ३८ मीटर आणि सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३ ते ३६ मीटर होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी २२.५.२०२२ या दिवशी रथोत्सवात वस्त्रालंकार परिधान केल्यानंतर वस्त्रालंकारांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१ अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रथोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांतील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत झालेली वाढ पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रथोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांतील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत झालेली वाढ १ ते २ सहस्र मीटरपेक्षाही अधिक आहे, हे पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी रथोत्सवाच्या दिवशी केवळ १-२ घंटे परिधान केलेल्या वस्त्रालंकारांवर झालेला सकारात्मक परिणाम पहाता हा सोहळा उच्च आध्यात्मिक स्तरावरील झाल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांच्या गळ्यातील फुलांचा हार अन् तुळशीची माळ, त्यांच्या हातातील शंख आणि गदा, तसेच त्यांच्या पायांतील मोजड्या यांतील सकारात्मक ऊर्जेतही रथोत्सवानंतर विलक्षण वाढ झाल्याचे दिसून आले. ते पुढे दिले आहे.

२. मागील काही वर्षांतील जन्मोत्सव सोहळ्यांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील तुलनात्मक अभ्यास

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मागील काही वर्षांतील जन्मोत्सव सोहळ्यांत परिधान केलेल्या वस्त्रालंकारांतील काही निवडक नोंदी पुढे दिल्या आहेत.

टीप १ – चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने त्यापुढे अचूक प्रभावळ मोजता आली नाही.
टीप २ – वर्ष २०१९ मध्ये पायातील तोडे आणि अंगठी यांच्या चाचण्या केलेल्या नाहीत.

वरील सारणीतून लक्षात येते की, प्रत्येक वर्षी जन्मोत्सव सोहळ्यांत परात्पर गुरु डॉक्टरांनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ उत्तरोत्तर अधिक वाढत आहे आणि वर्ष २०२२ मध्ये ती सर्वाधिक आहे.

सौ. मधुरा कर्वे

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ५ टक्के विष्णुतत्त्व असून ते जागृत होऊन कार्यरत होणे : श्रीविष्णूने त्रेतायुगात श्रीरामाच्या रूपात आणि द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला. ‘आताच्या कलियुगात श्रीविष्णूने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात ‘जयंत’ नामक अंशावतार धारण केला आहे’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ५ टक्के विष्णुतत्त्व असून ते जागृत होऊन कार्यरत झाले आहे. सध्याच्या कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले हे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. या ईश्वरी कार्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांकडून पुष्कळ प्रमाणात विष्णुतत्त्व (चैतन्य) प्रक्षेपित होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले अधिकतर निगुर्णावस्थेत असल्याने त्यांचे अधिकतर कार्य सूक्ष्मातून मोठ्या प्रमाणात चालू आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपाने श्रीविष्णूच्या ‘जयंतावतारा’ची दिव्यता सर्वांना अनुभवता यावी, यासाठी सप्तर्षींनी यंदा रथोत्सव साजरा करण्यास सांगितला. रथोत्सवात परात्पर गुरु डॉक्टरांनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांतील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत झालेली प्रचंड वाढ याचेच द्योतक आहे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रथोत्सवात श्रीविष्णूच्या रूपात दिव्य दर्शन देऊन साधकांचे जीवन कृतार्थ करणे

वर्ष २००७ पासून प्राणशक्ती अत्यंत अल्प असल्याने परात्पर गुरु डॉक्टर आश्रमातील त्यांच्या खोलीबाहेर पडलेले नाहीत. वर्ष २०१५ पासून प्रतिवर्षी त्यांची शारीरिक स्थिती चांगली नसूनही केवळ सप्तर्षींचे आज्ञापालन आणि समष्टीच्या कल्याणार्थ त्यांनी जन्मोसव सोहळ्यांत श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीसत्यनारायण या देवतांच्या रूपांत (वेशभूषेत) साधकांना दर्शन दिले. परात्पर गुरु डॉक्टरांनी सप्तर्षींच्या आज्ञेने यावर्षी रथोत्सवात सहभागी होऊन साधकांना श्रीविष्णूच्या रूपात दर्शन दिले. ‘न भूतो न भविष्यती ।’ अशा अत्यंत चैतन्यमय रथोत्सव सोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांचे दिव्य दर्शन झाल्याने साधकांचे जीवन कृतार्थ झाले, तसेच ‘चराचर सृष्टीही परात्पर गुरु डॉक्टरांचे दिव्य दर्शन घेऊन कृतार्थ झाली’, असे जाणवले. यासाठी सप्तर्षी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.७.२०२२)

ई-मेल : [email protected]

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, तर ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ या श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. साधकांचा आणि सनातन प्रभातच्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही महर्षींची आज्ञा म्हणून या विशेषांकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक