राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १०,६१० वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.८.२०२४ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

भारत भरातील २,८५० वाचकांचे जून मासापर्यंतचे, तर ७,७६० वाचकांचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण १०,६१० वाचकांचे सप्टेंबर पर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.

गणेशोत्सवाच्या काळात राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि अध्यात्मप्रसार यांच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करा !

७ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गणेशोत्सव असून अनेक गणेशमंडळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून भाविकांसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करावे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

प्रवासात स्वतःजवळ ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके ठेवा !

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने समाजमनात राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी पुढील प्रयत्न करा !

मंदिरे, शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, निवासी संकुले आदी ठिकाणी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयीच्या, तसेच क्रांतीकारकांचे माहात्म्य सांगणार्‍या प्रवचनांचे आयोजन करता येईल.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : जागर स्वातंत्र्याचा ! (आत्मनिर्भर भारत)

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरी आलेल्या नातेवाइकांना भेट म्हणून वरील ग्रंथ, लघुग्रंथ आणि देवपूजेसाठी उपयुक्त असलेली सात्त्विक उत्पादने यांचे आकर्षक भेटसंच बनवून देऊ शकतो.

साधक, वाचक, धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, हितचिंतक आणि अर्पणदाते यांच्यासाठी सूचना

विविध रेल्वेस्थानकांवर या लेखात म्हटल्याप्रमाणे आणि त्याहीपेक्षा वेगळ्या अशा अनेक समस्या असू शकतात. याविषयी तुमचे काही अनुभव असल्यास पुढील पत्त्यावर कळवा.