राष्ट्र आणि धर्मप्रेम !
‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा . त्यात अधिक आनंद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा . त्यात अधिक आनंद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’
‘भारत ९०० वर्षे पारतंत्र्यात असल्याने हिंदूंच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जगल्या. आता मनातील गुलामगिरीचे विष नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
जिथे पृथ्वीवरची सर्व माणसेच नव्हे, तर झाडे, डोंगर, नद्या इत्यादी एकसारखे दिसत नाहीत, तेथे ‘साम्यवाद’ हा शब्दच हास्यास्पद नाही का ?
१. ‘आपल्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती ही भगवंताची इच्छा आहे’, असे समजावे.
२. आपण संघर्षाला ईश्वराकडे घेऊन जायला हवे.
‘राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना ‘काहीतरी करा’, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥’ या गटात येतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
भक्ताला म्हणजे साधना करणार्यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्या महायुद्धात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होतील.’