अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्‍वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदू धर्मांतर करण्यामागील कारण !

‘हिंदू धर्मांतर करतात, ते ईश्‍वरप्राप्तीसाठी नाही, तर आर्थिक सुख-सोयींसाठी.असे लोक हिंदु धर्मात नाहीत, हेच बरे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेमुळे होणारा परिणाम

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कोणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांसमवेत दुरावा, भांडण होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

अध्यात्मात संशोधन करावे लागत नाही !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने संशोधन करावे लागत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘जगातील वैद्य, अभियंता, अधिवक्ता, वास्तूविशारद इत्यादी विविध विषयांतील तज्ञ, तसेच गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान इत्यादी एकही विषय दुसर्‍या विषयासंदर्भात एक वाक्य सांगू शकत नाहीत. फक्त अध्यात्मच विश्‍वातील सर्व विषयांच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माचे महत्त्व

‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाचा अहंकार असलेल्यांनो, अध्यात्माच्या तुलनेत विज्ञान किती थिटे आहे, हे समजून घ्या !

‘पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल इत्यादी सर्व विषय केवळ त्या त्या विषयातील माहिती सांगू शकतात. याउलट अध्यात्म हा विषय जगातील सर्व विषयांची माहिती सांगू शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन कसे हवे ?

‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहं न बाळगता हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना ‘मी करतो’, असा अहं बाळगण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते कार्य होणारच आहे; पण या कार्यात जे निःस्वार्थीपणे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले