परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘देवावर आणि साधनेवर विश्वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो.’
‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि आता राष्ट्रप्रेम नसलेले विविध राजकीय पक्ष यांच्यामुळे देश रसातळाला गेला आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतो, तसेच तिसर्या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे आजची मुले, तर कुठे वयाच्या ११ व्या वर्षी आत्मज्योतिज्ञान प्राप्त करणारे शंकराचार्य !’
‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कुणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले