अनुभूती विकत घेता येत नाही, तर त्यासाठी पात्र व्हावे लागते !

परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. आपण ज्या प्रमाणात किंवा ज्या टप्प्याची साधना (कृती) करू, त्या टप्प्याचे अध्यात्माचे विविध पैलू अनुभूतींच्या माध्यमातून लक्षात येऊ लागतात. प्रत्येक टप्प्याची अनुभूती येण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात साधना करून त्यासाठी सक्षम (पात्र) असणेही आवश्यक असते. कुणालाही पैसे देऊन अनुभूती विकत घेणे शक्य नसते. दुसरे म्हणजे एखाद्याने पात्रता नसतांना ती घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्याचा त्रास होऊ शकतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.१.२०२२)