रेल्‍वेत बाँबस्‍फोट करण्‍याच्‍या संशयास्‍पद संदेशानंतर महाराष्‍ट्रातील रेल्‍वेस्‍थानकांवर सतर्कतेची चेतावणी !

मुंबई पोलिसांना ७ जुलै या दिवशी रेल्‍वेत बाँबस्‍फोट घडवण्‍याविषयी संशयास्‍पद संपर्क आल्‍यानंतर राज्‍यभरातील रेल्‍वेस्‍थानकांवर सतर्कतेची चेतावणी देण्‍यात आली आहे.

परतीच्‍या प्रवासात माऊलींच्‍या पादुकांना नीरा स्नान !

सकाळी ९.३० वाजता पालखी सोहळा उत्‍साहात नीरा नगरीत दाखल झाला आणि येथील विठ्ठल मंदिरात विसावला. माऊलींच्‍या पादुका रथातून विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्‍यात आल्‍या होत्‍या.

राज्‍यातील राजकीय घडामोडींवर पुणेकरांचा ‘एक सही संतापाची’ मोहिमेस प्रचंड प्रतिसाद !

मागील काही मासांमध्‍ये देश आणि राज्‍यात चुकीच्‍या पद्धतीने राजकारण चालू आहे. आपण आज एकाला मतदान केले; पण ४ वर्षांत कोण कोणासह गेले ? हे समजत नसून या राजकीय लोकांनी लोकशाहीची थट्टा केल्‍याचे यातून दिसून येत आहे……

धर्माचे रक्षण, धर्माचरण या कृती आपल्‍या घरापासूनच कराव्‍या लागतील ! – अधिवक्‍ता अभिषेक भगत

महोत्‍सवाच्‍या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्‍यात आले. या वेळी स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके दाखवण्‍यात आली. शेवटी सर्वांनी हिंदु राष्‍ट्र स्‍थापण्‍याच्‍या कार्यात सहभागी होण्‍याची शपथ घेतली.

औरंगाबाद नावात तूर्तास कोणताही पालट न करण्‍याचे जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश !

जिल्‍ह्याच्‍या नामांतराच्‍या सूत्रावरून जिल्‍हाधिकारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी तूर्तास औरंगाबाद विभाग, जिल्‍हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांच्‍या नावात कोणताही पालट करू नये, असे आदेश येथील जिल्‍हाधिकारी आस्‍तिककुमार पाण्‍डेय यांनी ४ जुलै २०२३ या दिवशी दिले आहेत.

अवजड वाहनांसाठी वरंध घाटातील वाहतूक बंद करण्‍याचा निर्णय !

या रस्‍त्‍यासाठी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ८२३ कोटी रुपये संमत केले आहेत; मात्र या कामाची निविदा प्रक्रिया अद्याप चालू झालेली नाही.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील बसस्‍थानक सुशोभिकरणाचा प्रस्‍ताव अंतिम टप्‍प्‍यात

‘एस्.टी. बसस्‍थानक दत्तक योजना’ घोषित केली आहे. या अंतर्गत कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील २४ बसस्‍थानकांचे सुशोभिकरण करण्‍यात येणार आहे. यांसाठी उद्योजक, व्‍यापारी संस्‍था यांच्‍याकडे सूचना मागवण्‍यात आल्‍या आहेत.

कोयना धरणात २१.५७ टी.एम्.सी. पाणीसाठा !

कोयना धरणामध्‍ये पाण्‍याची आवक वाढली असली, तरी धरणातील पाणीसाठा लक्षात घेता कोयना चौथ्‍या टप्‍प्‍यामध्‍ये निर्माण होणारी वीजनिर्मिती अजूनही बंद ठेवण्‍यात आली आहे.

हिंदु राष्‍ट्र सेनेकडून के. चंद्रशेखर राव यांच्‍या फलकावर शाईफेक करत निषेध !

छत्रपती संभाजीनगर येथे बी.आर्.एस्. पक्षाचा पदाधिकारी मौलाना अब्‍दुल याने लुटारू औरंगजेबाचे उदात्तीकरण करत ‘औरंगजेब आमचा आदर्श आहे’,असे संतापजनक विधान केले आहे.

आपत्तीमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अद्यापपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. तथापि तो पडणार नाही, असे नाही. संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्कालामध्ये सजग आणि सतर्क रहावे- उदय सामंत