गुढीपाडवा हा हिंदूंच्या यशाचा आणि विजयोत्सवाचा दिवस आहे. या शुभमुहूर्ताच्या दिवशी केलेली प्रतिज्ञा (संकल्प) आणि प्रार्थना फलद्रूप होत असल्याने पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा आणि प्रार्थना करावी.
प्रतिज्ञा
१. ‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.
२. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आम्ही सदैव ढाल बनून उभे राहू.
३. देव, धर्म, संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या होणार्या विडंबनाला तीव्र विरोध करू.
४. व्यष्टी साधना, म्हणजे नामजपादी धर्माचरण करू आणि समष्टी साधना, म्हणजे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करून हिंदु धर्माची पताका संपूर्ण विश्वभर फडकावू.’
अशी आम्ही ब्रह्मध्वजासमोर प्रतिज्ञा करतो.
प्रार्थना
‘हे ब्रह्मदेवा आणि हे प्रतिपालक श्रीविष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापती, सूर्य आणि सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्या शक्तीतील चैतन्य आमच्यामध्ये सातत्याने टिकू दे. आम्हाला मिळणार्या शक्तीचा वापर आमच्याकडून साधनेसाठी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी केला जाऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
ज्येष्ठ मासातील महत्त्वाची व्रते !
पथ्य पाळायचे, तर खायचे काय ?
(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi
बकर्यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !