अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

एक रंगवाले ‘चिलिमजीवी’ लोकांच्या जीवनात सुख आणू शकत नाही. आम्ही समाजवादी सर्व रंगांद्वारे परिपूर्ण आहोत, असे संतापजनक विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करतांना केले.

पाकच्या उलट्या बोंबा जाणा !

भारतात अल्पसंख्यांक, विशेषतः मुसलमानांच्या विरोधातील हिंसा रोखली गेली पाहिजे. मुसलमानांचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण केले पाहिजे, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

काँग्रेसच्या राज्यातील भ्रष्टाचार जाणा !

‘राजस्थानमध्ये शिक्षकांना स्थानांतर करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते’, हे राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समोर शिक्षकांनी मान्य केले.

काँग्रेसवाल्यांची ‘अहिंसा’ जाणा !

जामनगर (गुजरात) येथील काँग्रेसचे अध्यक्ष दिभुगा जडेजा यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंदु सेनेने उभारलेल्या पंडित नथुराम गोडसे यांच्या पुतळ्याची तोडफोड केली.

हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

थिरूवनंतपूरम् (केरळ) येथे रा. स्व. संघाचे २७ वर्षीय स्वयंसेवक संजीत यांची ४ अज्ञातांनी १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी हत्या केली. या हत्येसाठी भाजपने ‘सोशल डेमोक्रिटिक पार्टी ऑफ इंडिया’ या राजकीय पक्षाला उत्तरदायी ठरवले आहे.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

केरळच्या शबरीमला मंदिरात मिळणारा ‘अरावणा पायसम’ हा पारंपरिक गोड प्रसाद बनवण्याचे कंत्राट मुसलमान व्यक्तीला देण्यात आले असून त्याला ‘अल् झहा’ असे अरबी नाव देऊन त्यावर ‘हलाल प्रमाणित’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

राहुल गांधीजी, जिहादी आतंकवाद काय आहे ?

‘हिंदुत्व म्हणजे शीख किंवा मुसलमान यांना मारहाण करणे आहे. अखलाकची हत्या करणे हेही हिंदुत्व होते का ?’, असा प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात उपस्थित केला.

‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत हत्या करणारे कोण आहेत ?

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे सर्व जण ‘मुनि’ असू शकत नाहीत. आजकाल ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे काही जण संत नाहीत, तर राक्षस आहेत, असे विधान काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी केले.

इस्लामच्या नावाखाली चालणारा आतंकवाद काय आहे ?

धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणे, दंगली करणे आणि दलितांवर अत्याचार करणे, हे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते हिंदुत्व नाही, असे विधान देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

यावर केंद्र सरकारने बंदी आणावी !

पहाटेच्या अजानमुळे लोकांची झोपमोड होते. पहाटे साधू-संतांची चालू असलेली पूर्जा-अर्चा किंवा ध्यान साधनेतही व्यत्यय येतो, असे विधान भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले.