अशांना कठोर शिक्षा करणारा कायदा हवा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘श्रीराम मांसाहारी होते’, असे विधान केले आहे. वाल्मीकि रामायणात असा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. आव्हाड यांच्यावर टीका होऊ लागल्यावर त्यांनी खेद व्यक्त केला.

हिंदूंनो, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांची स्वच्छता करा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भगवान श्रीरामाचे आगमन होत असल्याने श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडा आधीपासून, म्हणजे १४ ते २२ जानेवारी या कालावधीत देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे’, असे आवाहन केले आहे.

कर्नाटकातील काँग्रेसचे रावणरूपी सरकार !

कर्नाटकातील काँग्रेस सरकार श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रकरणातील राज्यातील ३०० आंदोलकांवर कारवाई करणार आहे. यासाठी कर्नाटक पोलिसांनी एक पथक स्थापन केले आहे.

सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच दाखवायचा का ?

रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी मुसलमानांनी त्यांच्या मशिदी, दर्गा आणि मदरसे येथे ११ वेळा श्रीरामाचा जप करावा, असे आवाहन केले आहे. याला असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध केला आहे.

असे संपूर्ण देशात करायला हवे !

उत्तराखंडमधील ५ सहस्र एकरहून अधिक भूमी ‘लँड जिहाद’द्वारे बळकावण्यात आली होती. ती सर्व भूमी सरकारने मुक्त केली आहे,

भारताने पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार मारावे !

मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी पाकने फेटाळली आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झारा बलूच यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आरोपींच्या प्रत्यार्पणासंदर्भात कोणताही करार नाही.

घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा मिळायला हवी !

बांगलादेशी घुसखोरांनी पुण्यात ६०४ बनावट पारपत्रे मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून चौकशी चालू आहे, तसेच या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

अशा अभिनेत्यांना हिंदू डोक्यावर घेतात, हे लज्जास्पद !

नाताळानिमित्त अभिनेते रणबीर कपूर यांनी केकवर दारू ओतली आणि त्याला आग लावली अन् ‘जय माता दी’ असे म्हटले.

काँग्रेसचा भगवान श्रीराम यांच्याप्रतीचा द्वेष जाणा !

‘काँग्रेसला भगवान श्रीरामांमुळे अडचण होती. आता देशात श्रीरामाचे उघडपणे समर्थन केले जात आहे’, असे विधान काँग्रेसची विदेशातील शाखा ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले.

मौर्य यांच्यासारख्यांना कारागृहात कधी डांबणार ?

‘पंतप्रधान मोदी यांनी ‘हिंदु कोणताही धर्म नाही’, असे म्हटले होते, तेव्हा भावना दुखावल्या जात नाहीत; मात्र मी असे विधान केल्यावर भूकंप होतो’, असे द्वेषमूलक विधान समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.