MP Oldest Temple : मध्यप्रदेशात उत्खननात सापडले देशातील आतापर्यंचे सर्वांत जुने मंदिर आणि शिवलिंग !

हे शिवलिंग पहिल्या किंवा पाचव्या शतकातील असल्याचे मानले जाते.

Bappanadu Temple : जत्रेच्या वेळी अन्य धर्मीय व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यास अनुमती न देण्याची मागणी

मंदिराच्या १५० मीटर क्षेत्रात अन्य धर्मीय व्यापार्‍यांना संधी देऊ नये आणि मंदिराच्या आवारात हिंदूंनीच व्यापार करावा, असे यात निवेदन म्हटले आहे.

मकोका लावलेल्या आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील १० जणांची पुराव्यांअभावी मुक्तता !

साध्या गुन्ह्यातही आवश्यक ते पुरावे गोळा करू न शकणारे पोलीस त्यांच्याविषयी संशयाला जागा ठेवतात !

मोहिमेच्या अंतर्गत भुईकोट गड, पुरातन महादेव मंदिर यांची स्वच्छता आणि व्याख्यान !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ असा दृष्टीकोन ठेवून भुईकोट गड येथे एकदिवसाच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पुण्यभूषण’ पुरस्कार घोषित !

ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाविषयी वर्ष २०२४ चा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पुण्यभूषण संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अंतर्गत रिक्त पदे भरतांना धाराशिव जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य द्या ! – शिवबाराजे प्रतिष्ठान

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून रिक्तपदे भरण्यासाठी विज्ञापन प्रसिद्ध झाले आहे.

मतदारांना योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न !

मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून केंद्र सरकारच्या योजनांचा आधार घेतला जात आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या योजनांचे अर्ज भरून देण्याचे काम केले जात आहे.

पत्रकारांच्या ‘घरकुल प्रकल्पा’चे लवकरच भूमीपूजन ! – श्री. शीतल धनवडे, अध्यक्ष, प्रेसक्लब, कोल्हापूर

गेली कित्येक वर्षे पत्रकारांच्या घरकुलाच्या प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न आता जवळपास मार्गी लागला असून लवकरच त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रमही लवकर पार पडेल, अशी ग्वाही ‘कोल्हापूर प्रेसक्लब’चे अध्यक्ष श्री. शीतल धनवडे यांनी दिली.

खडवली येथे झोपडपट्टीतून दगड मारणार्‍यांचा शोध चालू !

या घटनेत २ प्रवासी गंभीर घायाळ झाले. एकाच्या डोक्याला दुखापत झाली. दोघांना तत्परतेने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी आंबिवली, शहाड परिसरात लहान मुले रेल्वेमार्गात खेळतांना गाडीवर दगड फेकत अनेकदा उघडकीस आले आहे.

ठाणे येथील घोडबंदर रस्त्यावर वारंवार अपघात

भाईंदरपाडा येथे पहाटेच्या वेळी एक दांपत्य कामावर जाण्यास निघाले होते. एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकी पुढे घसरत गेली. दुचाकीवरील दांपत्य खाली पडून महिला गंभीर घायाळ झाली.