सांगली – कोयना-वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतीपर्जन्यवृष्टी होत असल्याने १२ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून धरणातून १० सहस्र १०० घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू आहे. धरणांमधील विसर्गामुळे आणि मुक्त पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी अंदाजे ३५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.