
‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’ची देखभाल आणि दिवाबत्ती यांसाठी देण्यात येणार्या शासकीय अनुदानात तब्बल ५५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाढ करण्यात आली आहे. महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या ऐतिहासिक मंदिराला पूर्वी मिळणार्या वार्षिक ३ सहस्र रुपयांच्या अनुदानात वाढ करून आता प्रतिवर्षी १ लाख रुपये इतके अनुदान संमत करण्यात आले आहे.’
(२३.५.२०२६)
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !