प्रसुती शस्त्रकर्माचे षड्यंत्र !

हिंदु महिलांच्या प्रसुतीमध्ये ‘सिझेरियन’चे (शस्त्रक्रिया करून प्रसुती करण्याचे) प्रमाण अधिक असते; मात्र मुसलमान महिलांच्या प्रसुतीमध्ये ते तेवढे दिसून येत नाही. आरोग्यधुनिक वैद्य ‘प्रसुती जिहाद’ करत असल्याचा आरोप कालीचरण महाराज यांनी केला आहे. कित्येक रुग्णालयात आधुनिक वैद्य पैसे कमावण्यासाठी आवश्यक नसतांना नैसर्गिक प्रसुतीऐवजी शस्त्रकर्म करून प्रसुती करतात, हे आपण जाणतोच; परंतु काही ठिकाणी हे अधिक जाणूनबुजून केल्याचेही लक्षात येत आहे. ‘‘जर एखाद्या मुलीची पहिल्यांदा प्रसुती असेल, तर तर तिचे ‘सिझेरियन’च करतात. हिंदु बालकांच्या गळ्यातच त्याची नाळ कशी काय अडकते ? हिंदु धर्मातील मुलेच का आडवे जन्माला येतात ? पैशांसाठी आधुनिक वैद्यांकडून रचण्यात आलेले हे एक षड्यंत्र आहे’’, असा आरोप कालीचरण महाराज यांनी केला आहे. ‘प्रसुती षड्यंत्र’ केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नसून हिंदूंचे अस्तित्व आणि लोकसंख्यावाढ यांवर होणारा हा एक मोठा आघात आहे.

नैसर्गिक प्रसुती झाली, तर स्त्रीला भविष्यात अधिक मुले होऊ शकतात; मात्र  एकदा शस्त्रकर्म झाले की, त्यानंतरच्या प्रसुतींमध्ये धोके वाढतात आणि लोकसंख्येवर मर्यादा येते. हे हिंदूंची लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी जाणीवपूर्वक आखलेले ‘लोकसंख्या नियंत्रण षड्यंत्र’ असल्याचे आता उघड होत आहे. हिंदूंना अल्पसंख्यांक करण्यासाठी हे एक छुपे शस्त्र म्हणून वापरले जात आहे. नैसर्गिक प्रसुतीपेक्षा शस्त्रक्रियेला प्राधान्य देऊन हिंदु घराणी आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या कमकुवत केली जात आहेत. एका सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी सहस्रो रुपयांचे देयकही आकारले जाते. हा पैसा फिरून पुन्हा त्याच यंत्रणेकडे जातो; जी हिंदु धर्माच्या विरोधात कार्यरत आहे. ही एक प्रकारची ‘आर्थिक युद्धनीती’ आहे, ज्याचा उद्देश हिंदूंना गरीब आणि कमकुवत ठेवणे हा आहे. या प्रक्रियेत अनेक हिंदु आधुनिक वैद्य सहभागी असणे, म्हणजेच हिंदूंचा धर्माभिमानशून्य झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या मानसिकतेला किंवा व्यावसायिक षड्यंत्राला खतपाणी मिळत आहे.

पूर्वीच्या काळी घराघरांत नैसर्गिक प्रसुती होत असे; मात्र पाश्चिमात्य वैद्यकीय पद्धतीचा (‘ॲलोपॅथी’चा) पगडा आणि मानसिकता यांच्या प्रभावाखाली आपण पारंपरिक संस्कृती विसरलो आहोत. हिंदु महिलांना गरोदरपणात द्यायचे ‘संस्कार’ आणि ‘आहार’ यांकडे दुर्लक्ष करून त्यांना रुग्णालयावर अवलंबून ठेवणे, हाही पाश्चात्त्यीकरणाचाच एक भाग आहे. कालीचरण महाराजांचे हे विधान केवळ आरोप म्हणून न पहाता त्यातील गांभीर्य समजून घेणे आवश्यक आहे. हिंदूंनी आता आपल्या आधुनिक वैद्यांवर आंधळा विश्वास न ठेवता सजग रहाण्याची वेळ आली आहे.

–  सौ. अपर्णा जगताप, पुणे