
रत्नागिरी : गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही प्रजासत्ताकदिनी रत्नागिरी शहरात ई-यंत्रण अर्थात् इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. रत्नागिरीतील ‘अनबॉक्स युवर डिझायर’ आणि पुण्यातील ‘पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. मांडवीपासून खेडशीपर्यंत रत्नागिरीतील एकूण १३ केंद्रांवर या दिवशी ई-कचरा स्वीकारला जाणार असून त्याचे नंतर शास्त्रोक्त पद्धतीने ‘रिसायकलिंग’ केले जाणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होऊन नागरिकांनी देशाच्या स्वच्छतेमध्ये मोठा हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा उपक्रम याच दिवशी रत्नागिरीसह राज्यातील १९ शहरांमध्ये राबवला जाणार आहे. गेल्या वर्षी रत्नागिरीतून एक टनहून अधिक ई-कचरा गोळा करण्यात आला होता.
ई-कचर्याच्या निर्मितीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. तंत्रज्ञान वेगाने पालटत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणेही वेगाने पालटावी लागतात. त्यामुळे ई-कचर्याचे प्रमाण जास्त आहे. या कचर्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास हवा, पाणी आणि भूमीचे प्रदूषण होते. पूर्णम इकोव्हिजन ही संस्था गेले दशकभर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहे. रत्नागिरीत गेल्या वर्षी प्रथमच ई-यंत्रण हा उपक्रम राबवण्यात आला आणि अनबॉक्स युवर डिझायर या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला होता. गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे यंदाही हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती ‘अनबॉक्स’चे गौरांग आगाशे यांनी दिली.

‘ई-यंत्रण’ या उपक्रमांतर्गत २६ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ई-कचरा गोळा करण्यात येणार आहे. ई-कचर्यामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, प्रिंटर, कम्प्युटर, माउस, फॅन्स, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, पेनड्राइव्ह, टीव्ही, डिजिटल कॅमेरा, एसी, व्हिडिओ कॅमेरा, सीडी / डीव्हीडी प्लेयर, मोबाइल फोन, होम थिएटर्स, चार्जर्स, हेडफोन्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स वर्किंग आणि नॉन वर्किंग आणि डिस्पोझेबल वस्तूंचा समावेश आहे. बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे रिसायकलिंग केले जाणार आहे. सुरू असलेले; परंतु वापरात नसलेले जुने कम्प्युटर्स किंवा अन्य वस्तूही कुणाला स्वेच्छेने द्यायच्या असल्यास देता येतील. या वस्तूंची आवश्यक दुरुस्ती करून त्या वस्तू ग्रामीण भागांतील शाळांना दिल्या जाणार आहेत.
|
ई-कचर्यामध्ये फ्लोरोसंट ट्यूबलाइट्स, इनकॅन्डेसन्ट बल्ब, सीएफएल यांचा समावेश नाही ! ई-कचरा गोळा करण्यासाठी शहरात अनुमाने १२ केंद्रे असून अधिक माहितीसाठी ‘अनबॉक्स युवर डिझायर’ – ८७६७४६१४९९ आणि रत्नागिरीतील सर्व ठिकाणांची लोकेशन्स पाहण्यासाठी क्लिक करा → https://tinyurl.com/4thp7byv |
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court