अपकीर्ती केल्यावरून मागितली केवळ १ रुपया हानीभरपाई

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विरोधात अपकीर्ती केल्याचा खटला देहलीतील पटियाला हाउस न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केला आहे. समाजिक माध्यमांवरील एका पोस्टद्वारे अवमान केल्यावरून ही याचिका प्रविष्ट करून हानीभरपाई म्हणून १ रुपयाची मागणी यात करण्यात आली आहे.
Defamation Case Filed 📄⚖️
Supreme Court advocate @Vishnu_Jain1 has sued Samajwadi Party (SP) chief Akhilesh Yadav for defamation over posts on X.
Case filed in Delhi’s Patiala House Court, seeking symbolic ₹1 compensation for reputational harm.
PC: @NewsX pic.twitter.com/QMVCTWrkaW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 19, 2026
या याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, कायदेशीर नोटीस पाठवूनही अखिलेश यादव यांनी त्यांच्या कृत्याविषयी खेद व्यक्त केला नाही किंवा क्षमा मागितलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात न्याय द्यावा.
काय आहे प्रकरण ?
अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा आरोप आहे की, नोव्हेंबर २०२४ मध्ये अखिलेश यादव यांनी ३ टिपण्या केल्या होत्या. संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशीद संदर्भातील दिवाणी अपीलच्या प्रकरणात अखिलेश यादव यांनी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना लक्ष्य केले होते. २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी शाही जामा मशीद न्यायालयीन आयुक्तांकडून झालेल्या सर्वेक्षणाच्या वेळी झालेल्या हिंसाचारासाठी समाजवादी पक्षाच्या समाजिक माध्यमांवरील खात्यांनी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना या हिंसाचाराला उत्तरदायी ठरवले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार अधिवक्ता जैन दायित्व पार पाडत होते. त्या ठिकाणी जमलेला हिंसक जमाव जैन यांच्यावर आक्रमण करण्याच्या उद्देशानेच आला होता, असेही अधिवक्ता जैन यांनी याचिकेत नमूद केले आहे.
याचिकेनुसार सर्वेक्षणासाठी जात असतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ‘जय श्रीराम’ या घोषणा दिल्यामुळे हिंसाचार झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला होता. ‘जय श्रीराम’ या घोषणांमुळेच हिंसा झाली’, असा दावा करण्यासाठी अखिलेश यादव यांच्याकडे कोणताही पुरावा नाही.
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !