राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर यांचे प्रतिपादन

रत्नागिरी – महाराष्ट्र एकमेव असे राज्य आहे, ज्या राज्यात १० भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहे. शासन स्तरावरून संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य संस्कृत अकादमी कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे भाषा हा विवादाचा नाही, तर संवादाचा विषय आहे आणि हीच शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर यांनी केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान’ या एक दिवसांच्या चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मंचावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील संस्कृत अन् प्राकृत विभागातील प्रा. दिनेश रसाळ, चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे श्री. प्रकाश देशपांडे आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी केले.

श्री. निंबाळकर म्हणाले की, येत्या काळात संस्कृत साहित्य अकादमीचे कार्य अधिक विस्तारित होणार आहे. अकादमीच्या वतीने संस्कृत भाषेतील लेखनाला प्रोत्साहन मिळावे आणि लेखकांना प्रेरणा मिळावी; म्हणून पुरस्कार योजना राबवली जाणार आहे. त्याचप्रमाणे संस्कृत भाषेत विविध माहितीपूर्ण लेखनासाठी शासनाकडून अनुदानसुद्धा दिले जाईल. त्याचसमवेत संस्कृतची महती जनसामान्यांपर्यंत पोचावी यासाठी संस्कृत साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यालासुद्धा अनुदान देण्यात येणार आहे.
प्रास्ताविक संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. त्यांनी चर्चासत्राचा उद्देश आणि कोकणातील विद्वान परंपरा यावर भाष्य केले. प्रा. दिनेश रसाळ यांनी कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या विषयाचा आढावा घेत विस्तृत मार्गदर्शन केले.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन