
मुंबई – कागदावरची शिवसेना संपवली, असे विजयी झालेल्यांना वाटले असेल; पण भूमीवरील शिवसेना त्यांना संपवता आलेली नाही. आमचा महापौर व्हावा, हे स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल, तर तेही होईल, असे विधान ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी केले. महापालिका निवडणुकीतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी त्या सर्वांचे अभिनंदन केले.
आम्हाला अपेक्षित आकडा गाठता आलेला नाही. त्यांनी गद्दारी केली. त्यांनी हे पाप कले. त्यांना मुंबईकर, मराठी माणूस क्षमा करणार नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा