
मुंबई – बहुतांश ठिकाणी मतदारांची नावे दुबार असल्याचे उघड होत आहे. मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी केवळ शाई पुसली जात नाही, तर लोकशाही पुसली जात आहे. बोटावरील शाई पुसली जात असल्याचे निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाकारत असतील, तर दोघांची मिलिभगत आहे. आयुक्त राजा नाही, तर मतदारराजा आहे. सध्या मात्र लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेविषयी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !