द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांचे उत्तर भारतातील महिलांविषयी आक्षेपार्ह विधान !

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू एक द्रविड राज्य आहे, जिथे तुमच्या प्रगतीला महत्त्व दिले जाते. अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये मुलींना काहीही करू दिले जात नाही. तमिळनाडूत आम्ही मुलींना ‘शिक्षण घ्या’, असे सांगतो, तर उत्तर भारतात मुलींना, ‘कामावर जाऊ नका. घरीच थांबा आणि स्वयंपाकघरात काम करा, मुले जन्माला घालावीत हेच तुमचे काम आहे’, असे सांगितले जाते, असे विधान द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी केले आहे. ते येथील ‘क्वाड-ए-मिल्लत गर्ल्स कॉलेज’मध्ये विद्यार्थिनींना संबोधित करतांना बोलत होते. दयानिधी मारन यांच्यासमवेत या कार्यक्रमात मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र तथा उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हेही उपस्थित होते. त्यांनी ‘उलगम उंगल कैयिल’ योजनेच्या अंतर्गत ९०० विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटले.
⚠️ Controversial Statement Alert! ⚠️
DMK MP Dayanidhi Maran claims that in North India, women are only told to give birth, while Tamil Nadu focuses on progress. 🤨🚫
Why this bias? If he cares about women's rights, why the silence on:
🔹 Triple Talaq
🔹 Burqa & Niqab
🔹 Hijab… pic.twitter.com/J9oV7iBi7o— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 15, 2026
मारन पुढे म्हणाले की, तमिळनाडूमध्ये मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरण यांवर लक्ष केंद्रित केले जाते. आमच्या विद्यार्थिनींना अभिमान वाटला पाहिजे. आम्ही तमिळनाडूमध्ये मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्यांना लॅपटॉप देतो, ज्याचा वापर त्या अभ्यास करण्यासाठी आणि मुलाखती देण्यासाठी करत आहेत.
मारन यांना सामान्य ज्ञान नाही ! – भाजप
भाजप नेते थिरुपथी नारायणन् यांनी मारन यांच्या विधानाचा निषेध करत म्हटले की, मला वाटत नाही की, दयानिधी मारन यांना काही सामान्य ज्ञान आहे. मी त्यांच्या विधानांचा तीव्र निषेध करतो. त्यांनी भारतातील लोकांची, विशेषतः हिंदी भाषिकांची क्षमा मागितली पाहिजे.
तमिळनाडूमध्ये ७३ टक्के महिला शिक्षित
वर्ष २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार तमिळनाडूमध्ये महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण सुमारे ७३.४४ टक्के आहे. हे ७ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकसंख्येशी संबंधित आकडेवारी आहे. हे उत्तर भारतातील बहुतेक राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. उत्तरप्रदेशात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ५७.१८ टक्के, हरियाणामध्ये ६५.९४ टक्के, राजस्थानमध्ये ५२.१२ टक्के आणि हिमाचल प्रदेशात ७५.९३ टक्के आहे.
संपादकीय भूमिकादयानिधी मारन यांनी मुसलमान महिलांच्या संदर्भातही बोलले पाहिजे. त्यांची स्थिती सांगितली पाहिजे. तिहेरी तलाक, बुरखा (पूर्ण शरीर झाकणे), नकाब, (चेहरा झाकण्याचे जाळी असलेले वस्त्र) हिजाब (डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) आदींविषयी विधान केले पाहिजे. ते यावर जाणीवपूर्वक बोलणे टाळतात, हे लक्षात येते ! |
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी