पंढरपूर येथील ताकपिठ्या विठोबा देवस्थानाचे भागवताचार्य बंडोपंत महाजन बडवे यांनी सांगितलेले सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे माहात्म्य !

भागवताचार्य बंडोपंत महाजन बडवे (बसलेले) आणि त्यांच्या शेजारी श्री. आप्पासाहेब सांगोलकर

१. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला भगवान श्रीकृष्ण उपस्थित रहाणार आहे’, असे सांगणे

‘मी ताकपिठ्या विठोबा देवस्थानाचे भागवताचार्य बंडोपंत महाजन बडवे यांच्याकडे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उपस्थित रहाण्याविषयीची विनंती करण्यास गेलो होतो. त्या वेळी ते त्यांच्या घरात असलेल्या बाळ श्रीकृष्णाच्या चित्राकडे बोट दाखवून म्हणाले, ‘‘या शंखनाद महोत्सवाला माझ्या मुलाच्या (श्री. नारायण बाळकृष्ण बडवे यांच्या) समवेत कन्हैयाही उपस्थित रहाणार आहे.’’ तेव्हा मला ‘त्यांच्या वाणीतून साक्षात् भगवंतच बोलत आहे’, असे जाणवले.

२. ‘भगवंताचे कार्य करण्याकरता साक्षात् भगवंतानेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपात अवतार धारण केलेला आहे’, असे सांगणे

मी शंखनाद महोत्सवाचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक भेट देण्यासाठी भागवताचार्य बंडोपंत महाजन बडवे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा तो अंक पाहून ते म्हणाले, ‘‘गुरुदेवांना सच्चिदानंद परब्रह्म ही पदवी कुणी दिली ?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘सप्तर्षि ‘जीवनाडीपट्टी’, तसेच विविध नाडीभविष्यांमध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे सांगितले आहे.’’ तेव्हा ते आनंदाने म्हणाले, ‘‘भगवंताचे कार्य करण्याकरता साक्षात् भगवंतानेच अवतार धारण केलेला आहे. त्यांच्याकडून येणार्‍या काळात प्रचंड प्रमाणात कार्य होणार आहे.’’ त्यानंतर त्यांनी शाल आणि प्रसाद देऊन माझा सत्कार केला. तेव्हा त्यांनी ‘गुरुदेवांचा सत्कार केला’, असे मला जाणवले आणि माझी भावजागृती झाली.’

– श्री. आप्पासाहेब सांगोलकर (वय ६६ वर्षे), पंढरपूर, जिल्हा सोलापूर. (१८.६.२०२५)