बांगलादेशातील हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांविषयी पुणे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

  • ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’कडून बांगलादेशाचा निषेध व्यक्त

  • बांगलादेशातील क्रिकेट खेळाडूंवर बंदीची मागणी

पुणे, ९ जानेवारी (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अत्याचार, हत्या आणि धार्मिक छळ तात्काळ थांबवण्यासाठी कठोर राजकीय हस्तक्षेप, आंतरराष्ट्रीय दबाव आणि बांगलादेशी, तसेच पाकिस्तानी खेळाडूंवर भारतात खेळण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याविषयीचे निवेदन ८ जानेवारी या दिवशी पुणे उपनिवासी जिल्हाधिकार्‍यांना ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’कडून देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री शरद नांगरे, आस्वाद जोशी, मोहन शिंदे, सचिन घुले आणि कृष्णाजी पाटील हे उपस्थित होते.

निवेदनातील सूत्रे

१. बांगलादेशात सुनियोजितपणे हिंदु समाजाला लक्ष्य करून हिंसाचार घडवून आणला जात आहे.

२. या हिंसाचारामागे सरकारमधील काही घटक, स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि जिहादी संघटना यांचा सहभाग दिसून येतो.

३. अशा घटनांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे प्रमाण सातत्याने घटत आहे. वर्ष १९४१ मध्ये २८ टक्के असणारे हिंदू आता केवळ ७ टक्के राहिले असल्याचे जनगनणेतून दिसून येते.

४. बांगलादेशातील कोणत्याही खेळाडूला भारतात कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत खेळू दिले जाऊ नये.