|
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)
कोलकाता (बंगाल) – परीक्षेत नक्कल (कॉपी) केल्याच्या संशयावरून इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका शाश्वती हलदर यांनी एका मुसलमान विद्यार्थिनीला हिजाब काढण्यास सांगितल्याची घटना येथील जादवपूर विद्यापिठात २२ डिसेंबर २०२५ या दिवशी घडली होती. या घटनेनंतर ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेने दीक्षांत समारंभाच्या वेळी व्यासपिठावर चढून प्राध्यापकांवर इस्लामविरोधी वर्तन केल्याचा आरोप केला.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बंगाल अल्पसंख्यांक आयोगाच्या ६ सदस्यीय पथकाने ३० डिसेंबरला विद्यापिठाला भेट दिली. पथकाने कुलगुरु नोंदणी अधिकारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. आयोगाचे अध्यक्ष इमरान अहमद यांनी विद्यार्थिनीला हिजाब काढण्यास भाग पाडणे चुकीचे आणि अस्वीकार्य असल्याचे सांगितले. या प्रकरणात सहभागी असलेल्या प्राध्यापिका शाश्वती हलदर यांना सेवेतून काढण्याची मागणीही त्यांनी केली.
विद्यापीठ समितीची भूमिका
या वादाची चौकशी करण्यासाठी जादवपूर विद्यापिठाने ५ सदस्यीय समितीची स्थापना केली. ६ जानेवारीला समितीने विद्यार्थिनी आणि इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकांचे जबाब नोंदवून घेतले. जबाब नोंदवल्यानंतर समितीच्या अध्यक्षा सैयद तनवी नसरिन यांनी प्राध्यापकांना पदावरून हटवण्याची मागणी केली; मात्र या मागणीला विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेतील कुलाधिपतींचे नामनिर्देशित सदस्य, तसेच समितीचे सदस्य काजी मसूम अख्तर यांनी विरोध केला. ‘चौकशी पूर्ण होण्यापूर्वी प्राध्यापकांना हटवणे हा त्यांचा अपमान ठरेल आणि समाजात चुकीचा संदेश जाईल’, असे त्यांनी नमूद केले. यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत प्राध्यापिका शाश्वती हलदर यांना ७ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.
शाश्वती हलदर यांनी, ‘मी केवळ माझे कर्तव्य बजावत होते’, असे स्पष्ट केले आहे.
संपादकीय भूमिकाबंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाल्याचीच ही लक्षणे आहेत ! |

४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !