‘आय.सी.जी.एस्. समुद्र प्रताप’ ही प्रदूषण नियंत्रण नौका भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट

पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – भारताचे संरक्षणासंबंधीचे उत्पादन वाढत आहे. आज भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात एवढी प्रगती केली आहे की, अत्यंत जटिल आणि आव्हानात्मक उत्पादन प्रक्रिया हाताळण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम झालो आहोत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उद्गार काढले. वास्को येथील गोवा शिपयार्डमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘आय.सी.जी.एस्. समुद्र प्रताप’ ही प्रदूषण नियंत्रण नौका भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट करण्यात आली. याप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचीही उपस्थिती होती.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, ‘‘भारतीय संरक्षण दलातील महिला अधिकारी आता वैमानिक, निरीक्षक, हवाई वाहतूक नियंत्रक, पुरवठा आणि वाहतूक (लॉजिस्टिक) अधिकारी या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्याचप्रमाणे हवाकुशन नौकांच्या संचालनासाठी (हॉवरक्राफ्ट ऑपरेशन) प्रशिक्षण घेत आहेत.
महिला अधिकारी आता भारतीय संरक्षण दलात केवळ साहाय्यकांच्या भूमिकेत नाहीत, तर त्या आघाडीवरील भूमिकेत आहेत. महिलांना अपेक्षित भागीदारी देणे, हे भारत सरकारचे लक्ष्य आहे. या अंतर्गत भारतीय तटरक्षक दलाने महिला सशक्तीकरणासाठी पावले उचलली आहेत.’’ ‘आय.सी.जी.एस्. समुद्र प्रताप’ ही नौका गोवा शिपयार्ड यांनी ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाच्या अंतर्गत सिद्ध केली आहे. या नौकेमुळे भारताची समुद्र संरक्षणासंबंधी स्वदेशी क्षमता वृद्धींगत झाली आहे.
दाबोळी विमानतळ नागरी उड्डाणासाठी चालूच रहाणार !
दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळाचे भविष्य आणि तेथील नागरी उड्डाणे बंद होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, ‘दाबोळी विमानतळ नागरी उड्डाणासाठी चालूच रहाणार आहे आणि हे संपूर्ण संकुल नौदलाच्या कह्यात देण्याचा कोणताही विचार नाही’, असे स्पष्ट केले आहे.
संरक्षण दलातील निवृत्त कर्मचार्यांसाठीची आरोग्य सेवा योजना सुविधा पूर्ववत् करणार
पणजी – संरक्षण दलातील निवृत्त कर्मचार्यांसाठीची आरोग्य सेवा योजना सुविधा पूर्ववत् करण्यात येणार असल्याची हमी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या वेळी दिली आहे. त्यांनी या योजनेच्या अंतर्गत निवृत्त कर्मचार्यांना कोणतीही असुविधा होणार नसल्याची हमी या वेळी दिली. ‘युनायटेड व्हेटरन असोसिएशन’ने वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांच्या माध्यमातून ही समस्या मांडल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही हमी दिली.

हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी