पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ या नौकेचे उद्घाटन नुकतेच केले. ‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ ही केवळ भारतीय बनावटीची नौका नसून प्राचीन काळात जशा नौका बांधल्या जायच्या, तशा प्रकारे बनवलेली ही नौका आहे ! एकही धातू न वापरता केवळ कापड, दोरखंड, नारळाच्या काथ्या, गोंद आणि लाकूड यांच्या साहाय्याने बनवलेली, विनाइंजिनाची आणि चौकोनी पाते असलेली वल्ह्यांची नौका !
‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ ही पोरबंदर येथून निघून मस्कत-ओमान या मार्गावर प्रयाण केले. प्राचीन व्यापारी-समुद्री मार्गावरून आखाती देशात जाण्याचे या नावेचे उद्दिष्ट आहे.

१. कौंडिण्यचा इतिहास आणि ‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ साकारण्यामागील संकल्पना
भारताच्या नाविक इतिहासातील ‘कौंडिण्य’ हे साधारण २ सहस्र वर्षांपूर्वी समुद्री प्रवास करणारे पहिले नाविक होते. ते दक्षिण पूर्व आशिया खंडात समुद्री प्रवास करत पोचले होते. कंबोडियातील किनार्याला लागल्यावर तेथील ‘सोमा’ या नागा राणीने त्यांना लढाईचे आव्हान दिले. पुढे राणीने त्यांच्याशी लग्न केले. दोघांनी कंबोडियामधील फुनान येथे स्वतःची राजधानी वसवली होती.
‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ बांधायचा विचार अजिंठा येथील ५ व्या शतकातील एका लेण्यात असलेल्या नावेच्या भित्तीचित्रावरून स्फुरण पावला. उत्तम लेखक, इतिहास तज्ञ आणि पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक सल्लागार श्री. संजीव संन्याल यांच्या संकल्पनेतून ही नौका साकार झाली.
२. ‘युक्ती कल्पतरू’ या ग्रंथानुसार ‘कौंडिण्य’ची बांधणी
भारतीय नौदल, भारत सरकारचा ‘सांस्कृतिक कार्य विभाग’ आणि गोव्यातील ‘होडी इनोव्हेशन्स’ यांनी या प्रकल्पात लक्ष घालून संपूर्ण साहाय्य केले. बाबू शंकरन् आणि प्रथमेश दांडेकर यांनी नौका बांधण्यात मुख्य भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केरळातील कुशल कारागिरांनी या नौकेची बांधणी केली. ‘युक्ती कल्पतरू’ या ११ व्या शतकातील प्राचीन ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार ही नाव बांधण्यात आली आहे. या नवीन नौकेच्या बांधणीमुळे आपल्या भारतीय नौदलाने सागरी वारसा पुनरुज्जीवित केला, तसेच प्राचीन समुद्रीप्रवास अथवा मार्गाचा पुनर्शोध घेतला, असे म्हणण्यास वाव आहे.
(साभार : विविध संकेतस्थळे)

पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?