Nigeria Indians Arrest : नायजेरियात मालवाहू नौकेत अमली पदार्थ सापडल्याने २२ भारतीय खलाशांना अटक  

AI निर्मित चित्र

लागोस (नायजेरिया) – येथील आपापा बंदरात ‘एमव्ही अरुना हुल्या’ नावाच्या  मालवाहू नौकेवर नायजेरियाच्या ‘नॅशनल ड्रग्ज लॉ एन्फोर्समेंट विभागा’ने धाड घालून ३१ किलो ५०० ग्रॅम कोकेन जप्त केले. या प्रकरणी नौकेच्या भारतीय कॅप्टनसह २२ भारतीय खलाशांना अटक करण्यात आली आहे.

१. परदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली भारतीय खलाशांना अटक झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे खलाशी तस्करीमध्ये जाणीवपूर्वक सहभागी होते कि त्यांना फसवले गेले ?, याचा शोध आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतला जाईल.

२. नायजेरिया गेल्या अनेक काळापासून युरोप आणि आफ्रिकी देशांमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्येही याच बंदरावर फिलीपाईन्सच्या २० खलाशांना २० किलो कोकेनसह अटक करण्यात आली होती.