
चेन्नई (तमिळनाडू) – मंदिरांमध्ये कोणताही मानवा सन्मान देतांना प्रथम मान हा केवळ देवतेलाच द्यायचा असतो. कोणत्याही व्यक्तीने विशेष मान हा आपला अधिकार असल्याप्रमाणे मागू नये आणि तसा दावा ग्राह्य धरला जाऊ शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने नमूद केले. श्रीरंगम् श्रीमठ अंडावन आश्रमाने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर न्यायालयाने वरील निर्णय दिला. कांचीपूरम् येथील देवराज स्वामी मंदिरात आश्रमप्रमुखांना वर्ष १९९२ पासून दिला जाणारा ‘पंचमुद्रा’ हा विशेष मान वर्ष २०२३ मध्ये थांबवण्यात आला होता. तो पुन्हा प्रारंभ करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
१. सुनावणीच्या वेळी हिंदु धार्मिक आणि धर्मादाय निधी विभागाच्या वतीने मांडण्यात आले की, विशेष सन्मान केवळ ५ मठप्रमुखांना दिला जातो. त्यात कांची कामकोटी पीठ, श्री अहोबिला मठ, नांगुनेरी श्री वनमालै मठ, मैसूर श्री परकाला जिअर मठ आणि उडुपी श्री व्यासराय मठ यांचा समावेश आहे.
२. या युक्तीवादाची नोंद घेत न्यायालयाने स्पष्ट केले की, मंदिरातील प्रथम सन्मान हा देवतेलाच द्यायचा असतो. ‘मठप्रमुखांना दिले जाणारे विशेष सन्मान हे अधिकार म्हणून दावा करण्यासारखे नाहीत’, असे सांगत आश्रमाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच तमिळनाडू हिंदु धार्मिक आणि धर्मादाय निधी अधिनियमानुसार मठप्रमुखांना दिल्या जाणार्या मानाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार केवळ संबंधित अधिकार्यांकडेच असल्याचे न्यायालयाने नमूद केले. श्रीरंगम् श्रीमठ अंडावन आश्रम प्रशासनाने आवश्यक असल्यास संबंधित विभागाकडे प्रतिनिधित्व करून उपाययोजना मागू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !