
तुळजापूर – १ जानेवारी या दिवशी श्री क्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीची ‘भवानी तलवार अलंकार’ महापूजा उत्साहात पार पडली. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना देवीने ‘भवानी तलवार’ प्रदान केली होती. या ऐतिहासिक स्मृतीप्रीत्यर्थ ही विशेष पूजा मांडण्यात आली. या वेळी देवीला सुवर्णालंकारांनी मढवून तिच्या हातात तलवार देण्यात आली होती, तसेच चरणांशी शिवरायांची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली होती. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या विलोभनीय दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !