पाकमध्ये चिनी नागरिकांच्या वाढत्या दादागिरीचे अनेक प्रसंग उघड

इस्लामाबाद (पाकिस्तान) – स्वार्थांध आणि अतीमहत्त्वाकांक्षी चीनकडून घेतलेल्या मोठ्या कर्जामुळे पाकिस्तानची आर्थिक अन् सामाजिक दुरवस्था झाली आहे. पाकमध्ये चिनी नागरिक उघडपणे अयोग्य वर्तन करत असल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. एका चिनी तरुणाचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. यात ‘तो बुरखा परिधान केलेल्या महिलांच्या हातात सिगारेट देतांना दिसतो. त्याच्यासमवेत असलेले लोक हसत असल्याचेही दिसते. या प्रकारामुळे महिलांची प्रचंड गैरसोय होते आणि त्या काहीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून जातात’, असे दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओवरून पाकमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पाकिस्तानी सरकारने चीनसमोर गुडघे टेकल्याचा पाकिस्तानी नागरिकांचा आरोप !
अन्य एका व्हिडिओत तोच चिनी तरुण सार्वजनिक ठिकाणी लोकांची टिंगलटवाळी करतो आणि रस्त्यावरील दुकानांतून पैसे न देताच खाऊ घेतो, असे दाखवण्यात आले आहे. अशा घटनांमुळे पाकिस्तान सरकार चीनसमोर गुडघे टेकल्याचा आरोप पाकिस्तानी नागरिकांनी केला आहे. इसरार अहमद राजपूत या पाकिस्तानी नागरिकाने म्हटले की, पाकमध्ये चिनी नागरिकांना गुन्हे करण्याची मोकळीक का दिली जात आहे ? फझल अफगाण यांनी लिहिले की, परकीय कर्ज देणारेच प्रत्यक्षात देशावर मालकी गाजवू लागले, तर अशी परिस्थिती निर्माण होते.
संपादकीय भूमिका
|
बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !