हिंदुत्वनिष्ठ संभाजी साळुंखे आणि राहुल चतुर्वेदी यांनी सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी उघड केल्यानंतर जागे झालेले प्रशासन !

कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासमवेतच भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी मंदिर परिसराची पहाणी केली. या पहाणीत त्यांनी मंदिर व्यवस्थापन, सुरक्षा आणि अतिक्रमण निर्मूलनाविषयी महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले.

१. मंदिराच्या बाहेरील सर्व विनाअनुमती बांधकामे तात्काळ हटवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले. मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवरील अधिकृत दुकानदारांची सूची सिद्ध करून, त्यांना अधिकृत क्रमांक देणे आणि त्यांच्या दुकानाच्या जागेचे चिन्हांकन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक नियमावलीमध्ये सुधारणा करण्यासाठी, नव्याने आवश्यक सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन आणि श्रीपूजक यांच्या संयुक्त बैठकीतून आवश्यक ‘एस्.ओ.पी.’ सिद्ध करण्यात येणार आहे. (ही सर्व पहाणी आणि उपयाययोजना हिंदुत्वनिष्ठ संभाजी साळुंखे आणि राहुल चतुर्वेदी यांनी सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी उघड केल्यावर का करण्यात आल्या ? यापूर्वीच या उपाययोजना का राबवण्यात आल्या नाहीत ? याचेही उत्तर भाविकांना मिळाले पाहिजे ! – संपादक)
२. वाहतूककोंडी टाळण्यासाठी दक्षिण प्रवेशद्वाराजवळील विद्यापीठ वाहनतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी भवानी मंडप या ठिकाणी स्वतंत्र वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे.
३. सध्याच्या ‘डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स’मध्ये आवश्यक सुधारणा करून, योग्य सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ‘बॅग स्कॅनर’मधून जाणार्या वस्तूंचा दैनंदिन अहवाल ठेवावा आणि प्रतिबंधित वस्तूंसाठी पारदर्शक खोक्यांची व्यवस्था करावी.
४. चित्रीकरण करण्यास अनुमती देण्यात येऊ नये.
५. गर्दीचे अचूक नियोजन करण्यासाठी मंदिरात येणार्या भाविकांचा प्रत्येक घंट्याला आढावा घेतला जाईल. भाविकांना व्यवस्थापनासंबंधी काही सूचना किंवा तक्रारी मांडायच्या असल्यास त्या लेखी स्वरूपात मंदिर व्यवस्थापन कार्यालयात सादर कराव्यात. या सर्व सूचनांची तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. या वेळी पोलीस, मंदिर, महापालिका प्रशासनाचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी उपस्थित होते.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !