१९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये ‘ऑपरेशन कालनेमी’ या राज्यव्यापी मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील ३ जिल्ह्यांमध्ये राबवलेल्या या विशेष मोहिमेद्वारे एकूण ५११ जणांना अटक करण्यात आली असून त्यात १९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे. त्यांपैकी १० जणांना परत बांगलादेशामध्ये पाठवण्यात आले आहे. उरलेल्या ९ जणांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू आहे. साधूचा वेश करून मुसलमान भीक मागत असल्यावरून ही कारवाई चालू करण्यात आली आहे.
🚨 Operation Kalnemi 🚨
🟧 Operation Kalnemi: 511 arrested – including 19 Bangladeshi infiltrators caught begging while posing in saffron attire
🗣️ “Hypocrisy in the name of faith will not be tolerated!” – Pushkar Singh Dhami
🇮🇳 Such strict action must be replicated across the… pic.twitter.com/GVSiYD6MYi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 27, 2025
जुलै २०२५ मध्ये या मोहिमेला प्रारंभ झाला. अधिकार्यांच्या माहितीनुसार हरिद्वार, डेेहराडून आणि उधमसिंह नगर या जिल्ह्यांमध्ये ही मोहीम चालू आहे. आतापर्यंत ४ सहस्र ५०० हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली
श्रद्धेच्या आडून पाखंडी कृत्ये सहन केली जाणार नाहीत ! – मुख्यमंत्री धामी

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, या मोहिमेचा संबंध कोणत्याही विशिष्ट समाजाशी नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे, तसेच देवभूमी उत्तराखंडची प्रतिष्ठा सुरक्षित ठेवणे हा या मोहिमेचा हेतू आहे. राज्यात श्रद्धा आणि विश्वास यांचा पूर्ण आदर केला जाईल; मात्र त्या आडून होणारे गुन्हे, पाखंडी कृत्ये अन् फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. अधिकार्यांना ही मोहीम कठोर आणि निष्पक्ष पद्धतीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकाअशी कारवाई संपूर्ण देशात करण्याची आवश्यकता आहे ! |

देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !