हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेची मागणी

पणजी, २४ डिसेंबर – बार्देश तालुक्यात शाळेत ने-आण करणार्या एका खासगी वाहनाचा चालक अल्लाबक्ष सय्यदाबडे याने ६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखा या अमानवी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करते. या प्रकरणी सरकारने संशयिताला अशी कठोर शिक्षा करावी, जेणेकरून इतर यापुढे असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत. त्याचप्रमाणे सरकारने पीडित कुटुंबियांना योग्य न्याय मिळवून देण्याबरोबरच सर्वतोपरी मानसिक आधार द्यावा, अशी मागणी ‘रणरागिणी’च्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, ‘‘या घटनेमुळे ‘शाळेत जाणारी मुले आज सुरक्षित आहेत का ?’, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांवरून ‘रणरागिणी’ शाखेने अनेक वेळा सरकार दरबारी आवाज उठवला आहे; मात्र या प्रकरणांचे पुढे काय होते ? याविषयी अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
अशा घटनांसमवेत आज हिंदु मुलींवर ‘लव्ह जिहाद’चेही संकट आहे. हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर केले जाते आणि धर्मांतर न केल्यास त्यांना मारहाण केली जाते. श्रद्धा वालकर किंवा अशी अनेक प्रकरणे याची साक्ष आहेत. नागरिकांनी अशा प्रकरणांमध्ये फसले जाऊ नये, यासाठी पुष्कळ सतर्कता बाळगणे, ही काळाची आवश्यकता आहे.’
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली