सातारा, फलटण आणि कराड येथे कारवाई

सातारा – ११२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) बँकेच्या सातारा, फलटण आणि कराड येथील शाखांवर धाड घातली. फलटणचे माजी आमदार दिवंगत कृष्णचंद्र भोईटे यांनी स्थापन केलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत ११२ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणात निष्पन्न झाले होते. या संदर्भात सनदी लेखापालांनी दिलेल्या तक्रारीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा नोंद आहे; मात्र पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. सर्व संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही.
१. कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुकुंद चरेगावकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज प्रविष्ट केले होते; मात्र ते न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. आता ‘ईडी’ने धाड घातल्याने आर्थिक गैरव्यवहाराच्या अन्वेषणाला गती येणार आहे.
२. या प्रश्नाला ज्यांनी वाचा फोडली, त्या भाजपच्या खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाल्या की, यशवंत बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सर्व संशयितांना एम्.पी.आय.डी. (ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम) लागू झाला पाहिजे.
३. सर्व संशयितांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांची देणी दिली पाहिजेत. बचत गटातील महिलांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकांच्या नावावर कर्जे काढली आहेत. त्याचे सखोल अन्वेषण करून संबंधितांना त्रासातून मुक्त केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !