India New Zealand Trade : (म्हणे) ‘नवा व्यापार करार भारताच्या अधिक हिताचा !’ – न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांचा जावईशोध

न्यूझीलंडचे परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स (मध्यभागी)

वेलिंग्टन (न्यूझीलंड) – भारत आणि न्यूझीलंड यांच्या पंतप्रधानांनी २२ डिसेंबरला केलेल्या मुक्त व्यापार कराराला आता न्यूझीलंडचे परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांनी दुसर्‍या दिवशी विरोध दर्शवला आहे. त्यांनी त्यांच्या एक्स खात्यावर म्हटले आहे, ‘मी भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराला मुक्त किंवा निष्पक्ष मानत नाही. दुर्दैवाने न्यूझीलंडसाठी हा एक वाईट करार आहे. या करारामुळे भारताला पुष्कळ काही मिळणार आहे; परंतु त्या बदल्यात न्यूझीलंडला मात्र पुरेसे काहीही मिळणार नाही. न्यूझीलंडच्या शेतकर्‍यांसाठी हा करार चांगला नाही. परिणामी ग्रामीण समुदाय या कराराचे समर्थन करणे अशक्य आहे.’

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मार्चपासून चालू असलेल्या वाटाघाटीनंतर २२ डिसेंबरला दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षर्‍या केल्या. या करारामुळे व्यापार, गुंतवणूक, नवोपक्रम (इनोव्हेशन) अशा विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. न्यूझीलंडकडून भारतात विविध क्षेत्रांमध्ये २० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार आहे.

संपादकीय भूमिका

असे वक्तव्य केवळ भारतद्वेषातूनच केले जाते, हे वेगळे सांगायला नको !