
ठाणे, २२ डिसेंबर (वार्ता.) – ठाणे जिल्हा ‘कीर्तन परिषदे’च्या वतीने शहापूर येथे १३ डिसेंबर या दिवशी हिंदु संमेलन आणि घरवापसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर, भिवंडी, मुरबाड, कल्याण अशा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून आलेल्या वारकर्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हे संमेलन पार पडले. त्या वेळी धर्मांतरित झालेल्या आदिवासी बांधवांची घरवापसी करण्यात आली.
संमेलनात उपस्थित कीर्तनकारांनी हिंदु धर्म-जागृती, धर्मांतराचा धोका आणि धर्मरक्षणाचे महत्त्व या विषयांवर प्रबोधन केले. आयोजक ह.भ.प. भास्कर महाराज म्हसकर, योगेश महाराज भोईर, विजय डिंगोरे आणि काका जगे यांनी संमेलन यशस्वी केले. जिल्ह्यातील २२ कीर्तनकार या संमेलनात सहभागी झाले होते. ह.भ.प. काळूराम महाराज कशीवले यांचे जागृतीपर कीर्तन विशेष आकर्षण ठरले.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !