‘पुणे पुस्तक महोत्सवा’त परराष्ट्रमंत्र्यांनी मांडले भारताच्या प्रखर परराष्ट्र धोरणाचे सूत्र

पुणे – भारतात एक काळ असा होता, जेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हते. त्यामुळे विविध पक्ष युती करून राजकारण करत असत. आज जगाचीही अशीच स्थिती झाली आहे. येथे कुणाकडेही स्पष्ट बहुमत नाही. अशा अस्थिर जागतिक वातावरणात भारताला अत्यंत चपळाईने आणि केवळ ‘राष्ट्रीय हित’ केंद्रस्थानी ठेवून कार्य करावे लागेल. माझ्या देशासाठी जे हिताचे आहे, तोच माझा पर्याय असेल, हाच आमचा मूलभूत सिद्धांत आहे, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी व्यक्त केले. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या वतीने आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त ‘डिप्लोमसी टू डिस्कोर्स’ (मुत्सद्देगिरी ते संवाद) या विषयावरील संवादात ते बोलत होते.
परराष्ट्रमंत्र्यांनी मांडलेली महत्त्वाची सूत्रे !
१. श्रीलंकेतील संकट असो किंवा कोरोना महामारीचा काळ; भारताने शेजारील राष्ट्रांना कुटुंबाप्रमाणे साहाय्य करून स्वत:चे नैतिक दायित्व पार पाडले आहे.
२. अमेरिकेशी संवाद साधणे कठीण आणि चीनचे व्यवस्थापन गुंतागुंतीचे झाले आहे. अशा वेळी रशियाचा विश्वास टिकवून युरोपला साहाय्यक बनवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
३. स्पर्धात्मक जगात दबून न रहाता भारताने आता आपला आवाज उठवला पाहिजे. खंबीर नेतृत्वामुळेच आज भारताचा ‘ग्लोबल ब्रँड’ (जगात वेगळी ओळख) निर्माण झाला आहे.
४. तरुणांनी केवळ देशापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगाकडे ‘कार्यक्षेत्र’ म्हणून पहावे; रशियासह अनेक देशांत भारतासाठी संधी उपलब्ध आहेत.
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
महापालिकेच्या कर संकलन विभागाची २ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी