|

नवी देहली – भारतात प्रतिवर्षी सुमारे ५ लाख रस्ते अपघात होतात, ज्यात सरासरी १ लाख ८० सहस्र लोकांचा जीव जातो. यांपैकी ६६ टक्के मृत्यू तरुणांचे (१८ ते ३४ वर्षे) होतात, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.
‘रस्ते, पायाभूत सुविधा सुधारून आणि कायदे कठोर करूनही सरकार मृत्यूंची संख्या न्यून करण्यात पूर्णपणे यशस्वी झालेली नाही’, अशी स्वीकृतीही मंत्री गडकरी यांनी या वेळी दिली.
🚨 India’s Road Safety Emergency
🇮🇳 Nearly 5 lakh road accidents yearly; 1.8 lakh deaths.
⚠️ 66% victims are youth (18–34): Nitin Gadkari in Parliament.
🚑 10-minute ambulance response could save 50,000 lives/year.
🛰️ Satellite tolling by 2026 = zero stops, ₹1,500 cr fuel… pic.twitter.com/BQY0au65By
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 18, 2025
गडकरी यांनी सांगितले की,
१. केंद्र सरकार राज्यांना आधुनिक रुग्णवाहिका देण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत रुग्णवाहिका अपघाताच्या ठिकाणी १० मिनिटांच्या आत पोचेल. जर घायाळांना वेळेवर उपचार मिळाले, तर ५० सहस्र लोकांचे जीव वाचू शकतात.
२. गेल्या ५ वर्षांत संमत झालेले ५७४ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प निश्चित वेळेपेक्षा मागे पडले आहेत. यांची एकूण किंमत सुमारे ३ लाख ६० सहस्र कोटी रुपये आहे. यांपैकी ३०० प्रकल्प एका वर्षापेक्षा अल्प, २५३ एक ते तीन वर्षे आणि २१ प्रकल्प ३ वर्षांपेक्षा अधिक काळापासून विलंबित आहेत. १३३ नवीन रस्ते प्रकल्प (एकूण किंमत १ लाख कोटी रुपये) भूसंपादन आणि वन संमती यांमध्ये अडकले आहेत.
वर्ष २०२६ पर्यंत उपग्रह टोल प्रणाली
गडकरी यांनी सांगितले की, वर्ष २०२६ पर्यंत देशभरात उपग्रह-आधारित टोल प्रणाली लागू होईल. हे तंत्रज्ञान उपग्रह आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांवर आधारित असेल.
वाहनांमधून ‘फास्टॅग’ आणि क्रमांक पट्टी ओळख तंत्रज्ञानाद्वारे न थांबता टोल कापला जाईल. यामुळे १ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होईल आणि ६ सहस्र कोटी रुपयांच्या अतिरिक्त महसुलात वाढ होईल. पूर्वी जिथे टोल पार करण्यासाठी ३ ते १० मिनिटे लागत होती, आता हा वेळ अल्प करून शून्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न