माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप

पुणे – मुंढवा येथील सरकारी भूमी अपहार प्रकरणात भूमीचा ताबा मूळ वतनदारांना मिळावा. कब्जा हक्काच्या सार्याची रक्कम भरून मूळ वतनदारांची नावे लावावी, असा मागणी अर्ज शीतल तेजवानी यांनी ‘अमेडिया आस्थापना’कडून जिल्हाधिकार्यांकडे केला होता. हा अर्ज पार्थ पवार यांनी केला असून भूमी मिळवण्यासाठी त्यांनी ४ वर्षांपासून पाठपुरावा केला असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप ‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते श्री. विजय कुंभार यांनी केला आहे.
श्री. विजय कुंभार म्हणाले, ‘‘वरील स्वरूपाचा अर्ज तेजवानी यांनी १० नोव्हेंबर २०२० या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला होता. १५ डिसेंबर २०२० या दिवशी हा अर्ज हवेली तहसीलदार यांच्याकडे वर्ग केला. अर्जातील मिळकतीविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असा आदेश दिला. २८ डिसेंबर २०२० या दिवशी ‘अमेडिया’ आस्थापनाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला. वर्ष २०२५ मध्ये या मिळकतीचे खरेदीखत करण्यात आले. त्यानंतर ‘अमेडिया’ने भूमी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला. ५ नोव्हेंबर २०२५ या दिवशी या भूमीचे अपहार प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये उजेडात आले. ‘अमेडिया’कडून वृत्तपत्रांमधील वार्तांमुळे आम्ही व्यथीत झालो असून आस्थापनाची बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा, अशा मागणीचे पत्र सादर केले. या पत्रावरही पार्थ पवार यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांचा सहभाग उघडपणे दिसून येतो.’’
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !