कायद्यातून महात्मा गांधी यांचे नाव गाळणार !
नवी देहली – केंद्र सरकार वर्ष २००५ मध्ये करण्यात आलेला मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम) कायदा बंद करण्याच्या सिद्धतेत आहे. त्याऐवजी पूर्णपणे नवे विधेयक आणले जात असून त्याचे नाव ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण विधेयक २०२५’ (वीबी- जय रामजी की) असे आहे. हा नवा कायदा ग्रामीण रोजगारासाठीच असणार आहे. याला काँग्रेसच्या खासदार प्रियांका वाड्रा यांनी विरोध करत टीका केली आहे.
प्रियांका वाड्रा म्हणाल्या की, महात्मा गांधी यांचे नाव का काढले जात आहे ? हा प्रश्न आहे. महात्मा गांधी हे केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील महान नेते मानले जातात. अशा व्यक्तीचे नाव हटवण्यामागचा उद्देश काय आहे ? हे समजत नाही. सरकारचा हेतू काय आहे ?

निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !