भाजप-शिवसेनेच्या आमदारांची आक्रमक विजय वडेट्टीवार यांनी क्षमा मागण्याची जोरदार मागणी !

नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकर्यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावरे विकू शकत नाही. राज्यात गोरक्षक नावाखाली बजरंग दलसारख्या संघटनेच्या टोळ्या सिद्ध झाल्या आहेत. ते शेतकर्यांकडून पैसे वसूल करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी १४ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात केला. याला भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी हरकत घेऊन आक्रमकपणे जोरदार विरोध केला. ‘बजरंग दल संघटनेचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याने या संघटनेचे नाव घेतल्याविषयी विजय वडेट्टीवार यांनी क्षमा मागावी’, अशी जोरदार मागणी भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी केली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी ‘बजरंग दल संघटनेचे नाव कामकाजातून काढून टाकले आहे’, असे सांगितले. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा तारांकित प्रश्न मांडला होता.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, जेव्हा शेतकरी जनावरांची वाहतूक करतात, तेव्हा त्यांना थांबवले जाते, धमकी दिली जाते. ऐकले नाही, तर मारहाण केली जाते. एका १७ वर्षाच्या शेतकर्याला इतकी मारहाण केली की, त्याने आत्महत्या केली. भाकड जनावर विकून शेतकर्यांना काही तरी पैसे मिळतात; पण आता या बनावट टोळ्या शेतकर्यांच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात. याविरोधात सरकारने कारवाई केली पाहिजे. ही वसुली थांबवली पाहिजे.
याला उत्तर देतांना पशूसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोवंशाची ने-आण करणारी वाहने अडवल्यास तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते. कुणाला पाठीशी घालण्यात येणार नाही. अहिल्यानगर येथे बनावट गोरक्षक बनून लुटमार करणार्या व्यक्तीविरुद्ध २ पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. शेतकर्यांकडील भाकड गायी संगोपनासाठी गोशाळेत ठेवण्यात येतात. या देशी गायींना प्रतिदिन ५० रुपये पशूअनुदान दिले जाते. भाकड जनावर प्रकरणी ज्या टोळ्या गैरलाभ घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याविषयी शेतकरी संघटनेकडून तक्रारीही आल्या आहेत.
देशी गायींसाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांचे प्रावधान करावे ! – संजय कुटे, आमदार, भाजप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उत्तराला आमदार संजय कुटे यांची हरकत !

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात १ कोटी शेतकरी आहेत. एका शेतकर्याकडे १० भाकड जनावरे असतील, तर प्रत्येकी ५० रुपये प्रमाणे प्रतिदिन ५०० रुपये गायींसाठी द्यावे लागतील. असे पैसे देण्यासाठी राज्याची तिजोरी ओसंडून वहात नाही. गोशाळा असतील, तर त्याची नोंद ठेवता येते. चुकीचे केले, तर त्याचे लेखापरीक्षण करता येईल. बनावट गोरक्षक लूटमार करत असतील, तर त्यावर बंधने आणली पाहिजेत.
अजित पवार यांच्या विधानाला हरकत घेतांना भाजपचे आमदार संजय कुटे म्हणाले की, शेतकरी गायींची पूजा करतो, त्यामुळे वाहनांतून गायींची वाहतूक करतांना शेतकरी गायींना त्रास होईल, असे अजिबात वागत नाही. शेतकरी इतरांप्रमाणे वाहनात गायींची कोंबून त्यांची वाहतूक करत नाहीत. गायींची कत्तल करणारे हे शेतकर्यांच्या नावे पावती फाडतात, हे खपवून घेतले जाणार नाही. प्रतिदिन १० गायी, भाकड जनावरांसाठी ५० रुपये देण्यास काहीच हरकत नाही. यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांचे प्रावधान करू शकतो, तसेच देशी गायींचा संवेदनशीलतेने आणि शेतकर्यांच्या भावनेचा विचार करून राज्यात गोशाळांची संख्या वाढवू शकतो.
संपादकीय भूमिकागोरक्षण करणार्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर टीका करणार्या काँग्रेसच्या नेत्यांना निवडणुकीत जागा दाखवणे आवश्यक ! |
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव