
वाशी : नवी मुंबईतील ३०० हून अधिक आघाडीच्या विकासकांचे प्रतिनिधित्व करणारी अग्रगण्य संस्था क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या वतीने २४ व्या ‘नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’चे उद्घाटन वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये करण्यात आले. १५ डिसेंबरपर्यंत हे ‘प्रॉपर्टी प्रदर्शन’ असणार असून याचे उद्घाटन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वर्षीच्या एक्स्पोची संकल्पना ‘नवी मुंबई : भविष्याची धावपट्टी’ अशी असून शहराच्या जलद परिवर्तनाची, नव्या प्रगत सुविधांची आणि आगामी विकास दिशेची अधोरेखित ओळख या संकल्पनेतून दाखवण्यात आली आहे.
उद्घाटन समारंभप्रसंगी नमुंमपा साहाय्यक संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण, ‘बी.ए.एन्.एम्.’चे अध्यक्ष रसिक चौहान, माजी अध्यक्ष वसंत भद्रा, उपाध्यक्ष ओमप्रकाश छाजेड, सेक्रेटरी जीगर त्रिवेदी, खजिनदार शैलेश पटेल, को-कन्वेनर महेश पटेल, हितेश गामी, तसेच इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनस्थळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचा उत्साह वाढवला.
या प्रदर्शनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची विक्री अन् प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. |
२४ व्या प्रॉपर्टी एक्स्पोचे नेतृत्व संयोजक महेश पटेल, सह-संयोजक झुबिन संघोई आणि हितेश गामी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून उत्कष्ट अनुभव आणि भव्य सादरीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. हा एक्स्पो खरेदीदार, गुंतवणूकदार आणि विकासक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याची माहिती क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.चे अध्यक्ष रसिक चौहान यांनी दिली.
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक