विधानसभेतील अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तरे नाहीत !

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत आले, तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तरे देण्यात आलेली नाहीत. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर १४ डिसेंबर या दिवशी सभागृहाची बैठक संपेपर्यंत या लक्षवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाही, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, अशी चेतावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १३ डिसेंबर या दिवशी दिली.
याविषयी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेले सूत्र अगदी योग्य आहे. कोणत्याही अधिकार्याला असे वाटत असेल की, विधीमंडळाच्या पीठासीन अधिकार्यांनी दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक नाही, तर त्यावर कारवाई केली जाईल. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत सभागृहाच्या पटलावर प्रलंबित लक्षवेधींची उत्तरे आली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाची कारवाई केली जाईल, अशी त्यांनी चेतावणी दिली.
बनावट चलनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेची २८ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !