विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने विविध आमदार आणि मंत्री यांना निवेदने !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांच्या विविध लोकप्रतिनिधींशी भेटी !

विविध लोकप्रतिनिधी-मान्यवर यांना राज्यातील विविध गंभीर प्रश्नांविषयीची निवेदने, ‘सनातन पंचांग २०२६’ भेट दिली
नागपूर – येथे महाराष्ट्राचे यंदाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. या निमित्ताने महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अध्यक्ष, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांसह समिती अन् सनातन संस्था यांच्या प्रतिनिधींनी विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवर यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील विविध गंभीर प्रश्नांविषयीची निवेदने दिली, तसेच ‘सनातन पंचांग २०२६’ भेट दिले. याविषयीचा छायाचित्रात्मक वृत्तांत येथे देत आहोत.

(‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा म्हणजे मंदिरांच्या भूमी अनधिकृतरित्या कह्यात घेण्याच्या विरोधातील कायदा)

१. नागपूर येथील सावनेर क्षेत्राचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांना ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ (भूमी अधिग्रहण) कायद्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्न्वेला यांनी निवेदन दिले. त्या वेळी ‘मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा विषय देईन’, असे आश्वासन आमदार आशिष देशमुख यांनी दिले.

आमदार आशिष देशमुख यांना निवेदन आणि ‘सनातन पंचांग

२. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना मुंबईत होणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ रहित करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. या वेळी ‘हे युवा पिढीसाठी गंभीर आहे. फेस्टिव्हल रहित करण्याविषयी पोलीस आयुक्तांसमवेत बोलतो’, असे आश्वासन त्यांनी दिले.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन दिले !

३. भाजपचे किनवट येथील आमदार भीमराव केराम, यवतमाळ येथील आमदार राजू तोडसम, शिरपूर येथील आमदार काशीराम पवार, नाशिक येथील आमदार दिलीप बोरसे, वर्धा येथील आमदार केचे यांची सुनील घनवट यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी आमदार काशीराम पवार यांना ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ यांच्या विरोधातील कायद्याच्या संदर्भातील निवेदन दिले. या वेळी त्यांनी ‘विधीमंडळात याविषयी औचित्याचे सूत्र घेऊ’, असे आश्वासन दिले.

डावीकडून आमदार भीमराव केराम, आमदार राजू तोडसम, निवेदन स्वीकारतांना आमदार काशीराम पवार, सुनील घनवट आणि आमदार दिलीप बोरसे, आमदार केचे

४. शिवसेनेचे मुख्य प्रतोद रमेश बोरनार यांना सुनील घनवट यांनी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायद्याच्या संदर्भात, ‘सनबर्न फेस्टिव्हल’ रहित करण्याच्या संदर्भात आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याच्या संदर्भात निवेदन दिले.

निवेदन देतांना अतुल अर्न्वेला आणि सुनील घनवट, आमदार रमेश बोरनार

५. भंडारा-गोंदिया येथील भाजपचे आमदार परिणय फुके यांना ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायद्याच्या संदर्भातील निवेदन सुनील घनवट यांनी दिले.

परिणय फुके यांना निवेदन देतांना सुनील घनवट

सुनील घनवट यांनी लोकप्रतिनिधींना ‘सनातन पंचांग २०२६’ भेट दिले !

शिवसेनेचे आमदार अमोल खताळ
शिवसेनेच्या आमदार डॉ. (सौ.) मनीषा कायंदे
आमदार संग्राम जगताप

या वेळी भाजपचे आमदार मोहन मते यांना समितीचे अतुल अर्न्वेला यांनी ‘सनातन पंचांग २०२६’ भेट म्हणून दिले.

भाजपचे आमदार मोहन मते यांना ‘सनातन पंचांग २०२६’ देतांना अतुल अर्न्वेला

आमदार सुरेश धस यांना अँटी लँड ग्रॅबिंग’ आणि  मुद्रांक शुल्क कायद्याच्या संदर्भात निवेदन दिले.

आमदार सुरेश धस यांना निवेदन देतांना सुनील घनवट