प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी
लिंगायत समाज तोडणार्यांवर केलेल्या टिपणीचे प्रकरण

बेळगाव – कोल्हापूर जिल्ह्यातील प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यावर बिळूर येथे केलेल्या प्रवचनातील विधानांमुळे लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद झाला आहे. बिळूर मठात ९ ऑक्टोबर या दिवशी झालेले प्रवचन सामाजिक एकोप्याला धक्का देणारे होते, असे तक्रारीत नमूद केले आहे. ‘हा गुन्हा राजकीय दबावाखाली नोंद केला असून मी माझ्या प्रवचनात असे काहीही बोललो नाही. मी केवळ सत्यच बोललो आहे’, असे या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितले.
🚨 Case Filed Against Param Pujya Kadsiddheshwar Swamiji in Bilur, Karnataka!
“This FIR was filed under political pressure. I did not say anything wrong in my discourse,” Swamiji told the media.
📌The Karnataka Congress Government has twisted his statement just to register a… pic.twitter.com/AfGYRUyfca
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 10, 2025
या संदर्भात प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘लिंगायत समाज तोडण्याचे पाप कर्नाटक सरकारमधील मंत्री मिळून करत होते. त्यामुळे मी माझ्या प्रवचनात लिंगायत समाज तोडणार्या लोकांच्या संदर्भात कडक टिपणी केली होती. तेथील एक मंत्री आणि कर्नाटक सरकार यांनी आकसापोटी माझ्याविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. समाज जोडणे आणि धर्म टिकवणे यांसाठी पुष्कळ परिश्रम घ्यावे लागतात. कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक अशी कृती करत आहे.’’
संपादकीय भूमिका
|
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक